By  
on  

2.O सिनेमाचा बॉक्स ऑफीसवर विक्रम; हिंदीत आत्तापर्यंत केली 20.25 कोटींची कमाई

दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत आणि बॉलिवूड खिलाडी अक्षय कुमार यांचा 2.O सिनेमाने प्रेक्षकांवर आणि बॉक्स ऑफीसवर जादू केलीय. सिनेमा प्रदर्शित होऊन दोनच दिवस झाले असून सिनेमाने हिंदीत या आत्तापर्यंत 20.25 कोटींची कमाई केली आहे. या हिंदी डब आवृत्तीच्या सिनेमाची निर्मिती करण जोहरच्या धर्मा प्रोडक्शनने केली असून त्यांच्यासाठी या सिनेमाचं ओपनिंग यामुळे धमाकेदार ठरलं. सिनेट्रेड विश्लेषकांनीसुध्दा सुट्टीचा दिवस नसतानाही प्रदर्शित झालेल्या या सिनेमाने इतक्या मोठ्या आकड्यांचा गल्ला जमविल्याबद्दल प्रचंड कौतुक केले आहे.

थलैवाच्या या सिनेमाने पहिल्या दिवशी घसघशीत कमाई केली आहे.‘2.0’ हिंदी, तामिळ आणि तेलुगू या भाषांमध्ये प्रदर्शित झाला. त्यापैकी हिंदी भाषेतील पहिल्या दिवसाची कमाई 20.25 कोटी रुपये झाली आहे.

https://twitter.com/taran_adarsh/status/1068418506868219904

2.0 सिनेमा 29 नोव्हेंबर रोजी देशभरात प्रदर्शित झाला रजनीकांतच्या प्रत्येक सिनेमासाऱखा या सिनेमाचा ही पहिला मॉर्निंग शो सकाळी 6 वाजता ठेवण्यात आला आणि रजनी चाहत्यांनी एकच जल्लोष साजरा करत हाऊसफुल्लचे बोर्ड झळकवले. तर इतर काही ठिकाणी पूजा व होम-हवन करत सिनेमाचं स्वागत करण्यात आलं.

शंकर दिग्दर्शित आशियातील सर्वात बिग बजेट सिनेमा 2.O हा सायन्स-फिक्शन सिनेमाद्वारे मोबाईलचे मानवी आयुष्यावर व पर्यावरणावर होणारे हानिकारक दुष्परिणाम दाखविण्यात आले आहेत.

सिनेमात अक्षय आणि रजनीकांत यांच्यासह अॅमी जॅक्सनसुध्दा महत्त्वपूर्ण भूमिकेत आहे.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive