By  
on  

कमल हसन सिनेमातून घेणार संन्यास; राजकारणावर करणार लक्ष केंद्रित?

दाक्षिणात्य सिनेसृष्टी आणि बॉलिवूड गाजवणारे दिग्गज अभिनेते अशी ओळख असलेले कमल हसन यांनी नुकताच एक महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर केला आहे. आपला आगामी सिनेमा इंडीयन 2 नंतर ते सिनेमा कारकिर्दीतून संन्यास घेणार असल्याचे त्यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केेले आहे.

१९९६ मध्ये बॉक्स ऑफीसवर सुपरहिट ठरलेल्या इंडियन सिनेमाचा हा सिक्वल असून यात कमल हसन यांच्यासोबत काजल अग्रवालची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. ‘2.0’चे दिग्दर्शक शंकर या सिनेमाचं दिग्दर्शन करणार आहेत.

यापूर्वी फेब्रुवारी महिन्यापासून कमल हसन यांनी राजकारणात सक्रीय प्रवेश केला. मक्कल निधी मय्यम हा पक्ष स्थापन करत त्यांनी निवडणूक लढवण्याची तयारी केली आहे. तामिळनाडूतील जनसेवेला प्राधान्य देण्याचं मत त्यांनी व्यक्त केलं होतं.

Recommended

PeepingMoon Exclusive