By  
on  

Oh God अजून एक रिमीक्स गाणं; पाहा 'ऑंख मारे'वर कोण थिरकतायत सारा-रणवीरसह

'ऑंख मारे..ओ लडकी ऑंख मारे' या ९० च्या दशकातील सुपरहिट गाण्याच्या रिमीक्स व्हर्जनवर सारा अली खान आणि रणवीर सिंह सिंबाची जोडी थिरकताना पाहायला मिळतेय. 'ऑंख मारे' हे रोहित शेट्टीच्या बहुचर्चित आणि आगामी सिंबा सिनेमातलं गाणं नुकतंच प्रदर्शित झालं. या गाण्यावर सारा आणि रणवीरची एकदमच हटके आणि धम्मला केमिस्ट्री जुळून आल्याचं पाहायला मिळतंय. पण महत्त्वाचं म्हणजे या गाण्यात फक्त सारा-रणवीरच नाही तर त्यांच्यासोबत गोलमालची संपूर्ण टीम धम्माल आणि त्यांची सिग्नेचर डान्स स्टेप करताना दिसली.

श्रेयस तळपदे, अर्शद वारसी, कुणाल खेमू आणि तुषार कपूर यांनी रणवीर-सारासोबत 'ऑंख मारे'वर जबरदस्त ताल धरला. त्यांच्या सिग्नेचर डान्स स्टेपवरुन त्यांनी गोलमाल 5 लवकरच येतोय याची प्रेक्षकांना चाहूल दिलीय.  तर सरप्राईज एलिमेन्टमध्ये यात निर्माता करण जोहरचीसुध्दा एक झलक पाहायला मिळाली.

नेहा कक्कर, मिका सिंह आणि कुमार शानू यांच्या स्वरसाज या 'ऑंख मारे..ओ लडकी ऑंख मारे'च्या रिमीक्स व्हर्जनला लाभला आहे.

https://youtu.be/_KhQT-LGb-4

रोहित शेट्टी यांचा सिंबा हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर सरत्या वर्षाला निरोप देत रेकॉर्डब्रेक कमाई करणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive