रॉयल वेडिंग तर झालं आता ऐका प्रियांकाचा हनिमून प्लॅन...

By  
on  

प्रियांकाच्या रॉयल वेडिंगच्या चर्चा संपण्याची चिन्ह दिसत नाहीत. लग्नातील तिच्या मेक अप आणि लूकचं कौतुक सगळीकडे होत आहे. प्रियांकाच्या रिसेप्शनला पंतप्रधानांची हजेरी हा मुद्दा देखील चर्चेत होता. आता हे नवं जोडपं अजूनही लाईमलाईटमध्येच आहे.

अलीकडेच प्रियांका आणि निकने एका कार्यक्रमाला उपस्थित होते. प्रियांकाने एक डिजीटल इन्व्हेस्टमेंट केली आहे. त्यासंबंधी बोलण्यासाठी तिने एका कार्यक्रमाला हजेरी लावली होती. यावेळी नव्या जोडप्याने अनेक प्रश्नांना अगदी हसत खेळत उत्तरं दिली. त्यातच कळीचा मुद्दा होता प्रियांकाच्या हनीमूनचा. लग्नासाठी स्पेशल अरेंजमेंट केलेल्या प्रियांकाचं हनीमूनचं प्लॅनिंग काय असेल हे जाणून घ्यायला प्रत्येकजण उत्सुक होता.

 

याला उत्तर देताना प्रियांकाने म्हणाली की, हनीमूनसाठी सध्या तरी तिने कोणताच प्लॅन केलेला नाहीये. कारण लग्नानंतर असलेल्या वर्क कमिटमेंट्स. पण निकने मात्र तिच्यासाठी नक्कीच काहीतरी स्पेशल प्लॅन केलेलं असेल असं तिला वाटतं. तिच्या मते, हे तिच्यासाठी सगळ्यात आनंददायी सरप्राईज असेल.

प्रियंका पुढे सांगते, नातं नवीन असताना तुमच्या इच्छा जपणं हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे. नवरी होणं हा प्रत्येक मुलीच्या आयुष्यातील सगळ्यात महत्त्वाचा क्षण असतो. त्यामुळे प्रत्येक गोष्ट तिच्या मनाप्रमाणेच व्हायला हवी. तिला जर हनीमूनला जायचंय तर तिथे जाण्यास प्राधान्य द्यावं  किंवा तिला तिचं काम पूर्ण करायचंय तर काम पूर्ण करावं, मुलीच्या मनाचा विचार होणं गरजेचं आहे.

प्रत्येक नववधू होणा-या मुलींसाठी प्रियांकाचं हे प्रेरणादायी वक्तव्य ठरतंय.

Tags

Recommended

Loading...
Share