By  
on  

केदारनाथच्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा; निर्मात्यांची चिंता मिटली

अभिनेता सुशांत सिंह आणि सैफ अली खानची लाडकी लेक सारा अली खानची पदार्पणाचा सिनेमा यांचा बहुचर्चित सिनेमा केदारनाथ वादाच्या भोव-यात सापडला होता. पण मुंबई हायकोर्टाकडून निर्मात्यांना आता दिलासा मिळाला असून त्याच्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा झाला आहे.

मुंबई हायकोर्टाआधी उत्तराखंड कोर्टानेसुद्धा या सिनेमाविरोधात दाखल करण्यात आलेली याचिका फेटाळून लावली आहे. याचिकाकर्त्यांच्या म्हणण्यानुसार सिनेमात लव जिहादचं समर्थन करण्यात आलं असून हिंदूच्या भावना दुखावण्यात आल्या आहेत.

न्यायालयाने याचिकेला पब्लिसिटी स्टंट असल्याचं म्हटलं आहे. तसंच  दंड देखील आकारण्यात आला आहे. सेन्सॉर बोर्डानं सिनेमा पाहून त्यातील अनावश्यकव आक्षेपार्ह भाग आधीच वगळला आहे. त्यामुळं प्रदर्शन थांबवण्याची गरज नाही, असं न्यायालयानं यावेळी नमूद केलं.

केदारनाथ हा सिनेमा 7 डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन अभिषेक कपूर यांनी केलं आहे.

https://twitter.com/ANI/status/1070596823109246976

 

केदारनाथ सिनेमा यापूर्वीसुद्धा अडचणीत सापडला होता. प्रलय परिस्थितीवर बेतलेल्या या सिनेमात पाण्याचा अपव्यय झाल्याचाही आरोप सिनेमाच्या निर्मात्यांवर करण्यात आला होता.

Recommended

PeepingMoon Exclusive