लग्नानंतर प्रियांकाने केला हा सर्वात मोठा बदल, कोणता ते जाणून घ्या

By  
on  

लग्नघरात नव्या नवरीबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता प्रत्येकालाच असते. भारतीयांमध्ये ती जास्त असते असं म्हणल्यास वावगं ठरणार नाही. कारण प्रियांका आणि निक जोनास यांचं लग्न पार पडलं तरी त्याबद्दलच्या चर्चा थांबायचं नाव घेताना दिसत नाहीत. प्रियांका आणि निकच्या स्वागत समारंभातील पाहुण्यांची आणि नव्या जोडप्याची चर्चाही खूप झाली. प्रियांकाचा नवरा आणि सासरची मंडळी विदेशी असले तरी लग्न मात्र देशी रीतीरिवाजांनीही पार पाडलं.

लग्नात नवी नवरी प्रियांकाही देशी आणि परदेशी स्टाईल सहजतेने कॅरी करताना दिसली. विशेष म्हणजे प्रियांकाने टिपिकल देसी मुलीप्रमाणे लग्नानंतर सासरचं आडनाव लावायला सुरुवात केली आहे. प्रियांकाने इन्स्टाग्राम हॅंडलवरील तिचं नाव बदलून ‘प्रियांका चोप्रा जोनास’ असं केलं आहे. त्यामुळे देसी गर्ल परदेशात रहात असली तरी तिच्यावरील संस्कार देसीच असल्याचं सिद्ध केलं आहे.

Tags

Recommended

Loading...
Share