By  
on  

राजकीय प्रवेशासाठी धकधक गर्ल सज्ज; पुणे नव्हे तर मुंबईतून हवीय माधुरीला उमेदवारी

बॉलिवूडची धकधक गर्ल माधुरी दीक्षित नेहमीच आपल्या सौंदर्याने आणि अभिनयाने प्रेक्षकांना भुरळ पाडते. पण हीच सर्वांची लाडकी अभिनेत्री आता राजकारणाच्या रिंगणात उतरणार असल्याच्या चर्चा जोर धरत आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार माधुरीने राजकारणात प्रवेश करण्यास आपला होकार कळवला असून पुण्यातून नव्हे तर मुंबईतून निवडणूक लढण्यास तिची पसंती असेल. इतकंच नव्हे तर माधुरीला ज्या मतदारसंघातून उमेदवारी हवीय त्या जागेचं प्रतिनिधित्व सध्या भाजप खासदार पूनम माहजन करत आहेत.

परंतु लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी भाजप माधुरी दीक्षितला पुण्यातून तिकीट देण्याचा विचार करत असल्याचं बोललं जात आहे. तसंच भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनीच राजकीय प्रवेशाबद्दल खुद्द अभिनेत्री माधुरी दीक्षित-नेनेसह चर्चा केल्याचे समजते. याच वर्षी एका अभियानासंदर्भात अमित शहा यांनी माधुरीच्याच घरी मुंबईत भेट घेतली होती.

दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेसुद्धा माधुरीच्य़ा सतत संपर्कात असून पुण्यातील मतदारसंघातून तिने उमेदवारी लढण्यासाठी ते तिची मनधरणी करत असल्याचे कळते. महत्त्वाचं म्हणजे पक्षाने यासंदर्भात एक अंतर्गत सर्व्हेसुद्धा केला होता. त्यानुसार माधुरीला पुण्यातील उमेदवारी देणंच फायद्याचं ठरेल असा निष्कर्ष काढण्यात आला आहे.

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive