By  
on  

सारा-सुशांतच्या 'केदारनाथ' प्रदर्शनावर उत्तराखंडमध्ये बंदी

सारा अली खान आणि सुशांत सिंह यांचा केदारनाथ सिनेमाच्या मागची साडेसाती काह संपायचं नाव घेत नाही. आजच 7 डिसेंबरला प्रदर्शित झालेल्या अभिषेक कपूर दिग्दर्शित सिनेमाच्या प्रदर्शनावर उत्तराखंडच्या सात जिल्ह्यांमध्ये बंदी घालण्यात आली आहे. याप्रकरणी मुख्यंमंत्र्यांच्या म्हणण्यानुसार जिल्हाअधिकारी आणि पोलिसांसोबत या सिनेमाबाबत सर्व शासकीय व्यवस्था पाहूनच सिनेमा प्रदर्शित करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

डेहराडूनचे जिल्हे आणि अल्मोड़ा, हरिद्वार, टिहरी येथे केदारनाथच्या प्रदर्शनावर बंदी घालण्यात आली आहे.

मुंबई हायकोर्टाआधी उत्तराखंड कोर्टानेसुद्धा या सिनेमाविरोधात दाखल करण्यात आलेली याचिका फेटाळून लावली होती. पण याचिकाकर्त्यांच्या म्हणण्यानुसार सिनेमात लव जिहादचं समर्थन करण्यात आलं असून हिंदूच्या भावना दुखावण्यात आल्या आहेत.

न्यायालयाने याचिकेला पब्लिसिटी स्टंट असल्याचं म्हटलं आहे. तसंच  दंड देखील आकारण्यात आला आहे. सेन्सॉर बोर्डानं सिनेमा पाहून त्यातील अनावश्यकव आक्षेपार्ह भाग आधीच वगळला आहे. त्यामुळं प्रदर्शन थांबवण्याची गरज नाही, असं न्यायालयानं यावेळी नमूद केलं.

केदारनाथ हा सिनेमा 7 डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन अभिषेक कपूर यांनी केलं आहे.

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive