By  
on  

साजिद खानवर एक वर्षाच्या निलंबनाची कारवाई; लैंगिक शोषणाचे आरोप भोवले

#MeToo प्रकरणावर आत्तापर्यंत करण्यात आलेली सर्वात मोठी कारवाई म्हणजे बॉलिवूड दिग्दर्शक साजिद खानवर एक वर्षांंची बंदी. लैंगिक गैरवर्तणुकीसारखे गंभीर आरोप असलेल्या दिग्दर्शक साजिद खानवर भारतीय चित्रपट आणि टेलिव्हिजन दिग्दर्शक संघटनेनं (IFTDA) ही निलंबनाची कारवाई केली आहे. ही बंदी जवळपास एक वर्षासाठी घालण्यात आल्याची माहिती 'एएनआय' या वृत्तसंस्थेने प्रसिद्ध केली आहे.

अभिनेत्री रॅचेल व्हाईट, सिमरन सुरी ,सहाय्यक दिग्दर्शक सलोनी चोप्रा आणि पत्रकार करिष्मा उपाध्याय यांनी IFTDAकडे साजिदविरोधात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर IFTDA ही कारवाई करण्याचा निर्णय घेतला. या पोस्टनंतर साजिद खानवर देशभरातून प्रचंड टीका झाली. अक्षय कुमार, रितेश देशमुख यांनी साजिदसोबत काम करण्यास नकार दिला होता, तर स्वत: साजिदनं जबाबदारी स्वीकारत हाऊसफुल्ल 4चं दिग्दर्शक पदही सोडलं होतं.

https://twitter.com/ANI/status/1072673908078403585

Recommended

PeepingMoon Exclusive