हे नवविवाहित जोडपं देणार रिसेप्शन, मुंबईमध्ये जोरदार तयारी

By  
on  

लग्न होऊन दोन आठवडे होत आले तरी प्रियांका चोप्राचा ‘वेडिंग मूड’ अजून संपलेला दिसत नाही. प्रियांका आणि निक यांच्या मुंबई रिसेप्शनची जोरदार तयारी सुरू आहे. विशेष म्हणजे प्रियांका मुंबईमध्ये एक नाही तर दोन रिसेप्शन होस्ट करणार आहे. प्रियांकाने लग्नानंतर लगेचच दिल्लीमध्ये एका रिसेप्शन आयोजित केलं होतं. या रिसेप्शनला खुद्द पंतप्रधानांनीही उपस्थिती लावली होती.


त्यानंतर हे नवीन जोडपं शॉर्ट हनीमूनसाठी ओमानला गेलं होतं. प्रियांका आणि निक दोघंही नुकतेच ओमानवरून परत आले आहेत. १९ आणि २० तारखेला हे दोन्ही रिसेप्शन पार पडतील.
१९ तारखेच्या रिसेप्शनमध्ये प्रियांकाचे नातेवाईक आणि इतर पाहुण्यांचा समावेश असेल. तर २० तारखेच्या रिसेप्शनमध्ये प्रियांका तिच्या सिनेसृष्टीमधील मित्रांना आमंत्रित करणार आहे. या दोन्ही रिसेप्शनचं ठिकाण मात्र वेगवेगळं असणार आहे.
प्रियांका या दोन्ही रिसेप्शनसाठी भलतीच उत्सुक आहे.

Tags

Recommended

Loading...
Share