By  
on  

अंकिता लोखंडे बनली झलकारी बाई, पाहा 'मणकर्णिका'मधील तिचा फर्स्ट लूक

पवित्र रिश्ता या हिंदी मालिकेतून घराघरांत लोकप्रिय झालेली मराठमोळी अभिनेत्री अंकिता लोखंडे सर्वांनाच माहिती आहे.पण मध्यंतरी अंकिता कुठेच दिसली नाही. ती कुठेतरी गायब झाली होती. तिची कुठलीच मालिका किंवा आगामी प्रोजेक्टची घोषणा झाली नव्हती. त्याला तसं ठोस कारणही होतं, ते म्हणजे कंगना राणावतच्या महत्त्वकांक्षी अशा मणकर्णिका- द क्वीन ऑफ झांसी या सिनेमात अंकिता झलकारी बाई ही महत्त्वपूर्ण व्यक्तिरेखा साकारतेय.

मणकर्णिका- द क्वीन ऑफ झांसी या आगामी सिनेमातील कंगना राणावतचे विविध लूक्स आपण नेहमीच पाहिले आहेत. पण या सिनेमातील झलकारी बाईच्या व्यक्तीरेखेतील अंकिता लोखंडेचा फर्स्ट लूक नुकताच उलगडला आहे.

इंग्रजांना सळो की पळो करुन सोडणा-या झाशीच्या राणीच्या लढ्यात तिला नेटाने साथ देणा-या झलकारी बाईची शोर्यगाथा अंकिता पडद्यावर जीवंत करणार आहे.

https://www.instagram.com/p/BqenyUggid2/

झलकारी बाई ही वीरांगना होती. तसेच ती राणी लक्ष्मीबाईंच्या जवळची होती. दोघींच्या चेह-यातील साम्यामुळे त्या वेष पालटून दुश्मनांना सळो की पळो करुन सोडायच्या. या ऐतिहासिकपटात अंकिताला पाहणं एकप्रकारे उत्कंठावर्धक असणार आहे, साहजिकच सर्वांना अंकिताच्या या पहिल्या बॉलिवूड सिनेमाची उत्सुकता लागून राहिली आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive