By  
on  

जान्हवी कपूरला डेट करण्याबद्दल ईशान म्हणतो....

शाहिद कपूरचा भाऊ ईशान खत्तर आणि बोनी कपूर व श्रीदेवींची लाडकी कन्या जान्हवी यांनी धडक सिनेमातून बॉलिवूडमध्ये दमदार पदार्पण केलं. सिनेमातील त्यांच्या केमिस्ट्रीचं प्रेक्षकांसह समीक्षकांनी प्रचंड कौतुक केलं. या सिनेमामुळे दोघांमध्ये घट्ट मैत्री जमलीय. नेहमीच या दोघांना एकत्र स्पॉट करण्यात येतं. तसंच यामुळे ईशान व जान्हवी एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चासुध्दा रंगल्या आहेत.

तुम्हाला माहितच असेल निर्माता-दिग्दर्शक करण जोहरच्या 'कॉफी विथ करण' शोमध्ये जेव्हा जान्हवीने भाऊ अर्जुन कपूरसोबत हजेरी लावली होती, तेव्हा त्याने जान्हवीला ईशानला डेट करण्याबाबत प्रश्न केला होता. तेव्हा अर्जुन व जान्हवी दोघांनीसुध्दा या प्रश्नाला अगदी मजेत उडवून टाकलं होतं. पण महत्त्वाचं म्हणजे ईशानलासुध्दा एका अवॉर्ड सोहळ्यात जान्हवीवरुच घेरण्यात ालं तेव्हा तो म्हणाला, करण कुठलाच प्रश्न मजेत विचारत नाही. त्याने मलासुध्दाच प्रश्न केला आहे आणि मी त्याचं उत्तरसुध्दा दिलंय.

तर ईशान खत्तर भाऊ शाहिद कपूरसोबत 'कॉफी विथ करण'मध्ये सहभागी होणार आहे. त्यामुळे सर्वांनाच आता ईशानच्या उत्तरासाठी 'कॉफी'च्या या भागाची  उत्सुकता लागून राहिली आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive