By  
on  

रणवीरचे हे शब्द ऐकताच दीपिकाला अश्रू अनावर

बॉलिवूडचे बाजीराव-मस्तानी म्हणजेच दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह यांनी इटलीतील लेक कोमो येथे आयुष्यभराच्या आणाभाका घेतल्यानंतर आता अभिमानाने पती-पत्नी म्हणून मिरवू लागले आहेत. कुठल्याही इव्हेंट किंवा समारंभाला ही जोडी एकत्रच उपस्थिती लावते. नुकतंच या दोघांच्या आयुष्यात एक खास क्षण आला आणि तेव्हा भावना अनावर झाल्याने दीपिकाला रडूच कोसळले.

तर त्याचं झालं असं, स्टार स्कीन अवॉर्ड्स नुकतेच संपन्न झाले. यात रणवीर सिंहला पद्मावत या सुपरहिट सिनेमातील अल्लाउद्दीन खिलजीची व्यक्तिरेखा साकारण्यासाठी बेस्ट अॅक्टरच्या पुरस्काराने त्याला सन्मानित करण्यात आले. लग्नानंतर रणवीर पहिल्यांदाच यानिमित्ताने पहिल्यांदा पुरस्कार स्विकारत होता. यावेळी दीपिका हजर होती.

https://www.instagram.com/p/BredPvZlJpw/

रणवीरच्या जेव्हा स्टेजवर पुरस्कार स्विकारण्यासाठी गेला तेव्हा दीपिकाच्या चेह-यावरचा आनंद ओसंडून वाहत होता. तर रणवीरलासुध्दा भावना रोखणं अशक्य झालं. तो म्हणाला, "सिनेमात मला राणी मिळाली नाही. पण रिअल लाईफमध्ये तु मिळाली मला माझी क्वीन." तो पुढे म्हणाला," मी मागील सहा वर्षात जे काही मिळवलंय त्याचं कारण फक्त तुचं आहेस, दीपिका. तुझ्यामुळेच माझे पाय आजही जमिनीला आहेत.मी तुझ्यावर खुप खुप प्रेम करतो. तु मला जे काही दिलं आहे, त्यासाठी धन्यवाद."

https://www.instagram.com/p/BrdUp9sgYZD/

पती रणवीरचे हे प्रेमाचे आणि आपुलकीचे शब्द ऐकून पत्नी दीपिकाला आनंदाने भरुन आलं आणि तिने आपल्या भावनांना वाट मोकळी करुन दिली.

 

Recommended

PeepingMoon Exclusive