By  
on  

पाहा व्हिडीओ: जेव्हा रणवीर साराचा हात कार्तिकच्या हातात देतो

तुम्हाला कॉफी विथ करणच्या 6 व्या सीझनचा तो एपिसोड नक्कीच लक्षात असेल, ज्यात सैफ अली खान आणि त्याची लाडकी लेक व आत्ताची नवोदित अभिनेत्री सारा अली खानने हजेरी लावली होती. त्या भागात या बाप-बेटीच्या अफलातून जोडीने धम्माल उडवून दिली व वैयक्तिक आयुष्यातल्या अनेक खुसखुशीत गोष्टी करण व प्रेक्षकांसोबत शेअर केल्या.

पण महत्त्वाचं म्हणजे करणच्या या मोस्ट पॉप्युलर शोमध्ये साराने आपल्याला अभिनेता कार्तिक आर्यनसोबत डेटवर जायची इच्छा असल्याचं मनोगत व्यक्त केलं व नॅशनल टेलिव्हिजनवरुन ही बातमी अगदी वा-यासारखी पसरली. सर्वत्र सारा आणि कार्तिकला हे एकच प्रस्न केला जात होता. प्रसिध्दी माध्यमांनीसुध्दा हे मजेशीर प्रकरण उचलून धरलं. मात्र हे दोघं आत्ता कॉफी डेटवर जाणार का कार्तिक आणि साराचा कुठला सिनेमा येणार हे काही आपल्याला ठाउक नाही, पण एवढं मात्र नक्की की या दोघांची सेटींग करुन देण्यात बॉलिवुडचा सिंबा मात्र पुढाकार घेतोय.

एका पुरस्कार सोहळ्या दरम्यान नुकतंच अनेक कलाकारांनी उपस्थिती लावली होती. त्यावेळेस रणवीर सिंह आणि सारा तर होतेच पण कार्तिकसुध्दा होता. मग काय, रणवीरला सांगायला हवं, त्याने यावेळी सारा कार्तिकची फक्त भेटच घडवून दिली नाही तर साराचा हातात चक्क कार्तिकच्या हातात दिला. दोघंही खळखळून हसायला लागले.

https://www.instagram.com/p/BrlHn3UjcSf/

सारा अली खान आणि रणवीर सिंह स्टारर सिंबा हा सिनेमा येत्या 28 डिसेंबरला प्रदर्शित होत आहे. त्यापूर्वी मागच्या दोन आठवड्यांपूर्वी साराचा केदारनाथ हा पदार्पणाचा सिनेमा प्रदर्शित झाला होता, यातील तिच्या भूमिकेचं प्रचंड कौतुक करण्यात आलं होतं.

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive