By  
on  

'ठाकरे'चा ट्रेलर आज होणार लाँच पण सिनेमा मात्र सेन्सॉरच्या कचाटयात

अवघ्या महाराष्ट्राचं प्रेरणास्थान शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या झंझावत उलगडणारा जीवनपट ‘ठाकरे’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. सिनेमाचा टीझर उलगडल्यापासूनच याबाबत तमाम सिनेरसिकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झालीय. अभिनेता नवाजुद्दीन सिध्दीकी यात बाळासाहेबांची व्यक्तिरेखा साकारतोय हे या सिनेमाचं खास वैशिष्ट्य. पण हा बहुप्रतिक्षीत सिनेमा सेन्सॉरच्या कचाटयात अडकल्याचं वृत्त आहे. महत्त्वाचं म्हणजे आज, बुधवारी दुपारी या सिनेमाचा ट्रेलर लॉंच आहे. त्यामुळे यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.

सेन्सॉर बोर्डाने आक्षेप घेतल्यामुळे या सिनेमाचा ट्रेलर लाँच होणार की नाही, याबाबत अजुन काहीही निश्चित माहिती उपलब्ध नाही. पण, शिवसेना खासदार आणि सिनेमाचे निर्माते संजय राऊत यांनी ट्रेलर नियोजित वेळेनुसारच लाँच होईल, असे स्पष्ट केलं आहे. त्यासाठी, शिवसेना नेते सेन्सॉर बोर्डाची एकूण प्रक्रिया आणि संबंधित बाबींची पूर्तता करत असल्याचेही समजते.

संजय राऊत यांनी या सिनेमाची पटकथा लिहिली असून त्यासाठी त्यांना तब्बल चार वर्षे लागली. अभिजीत पानसे यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केले आहे.

https://twitter.com/ThackerayFilm/status/1077462454584643584

२३ जानेवारी २०१९ रोजी ‘ठाकरे’ हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive