By  
on  

सिंबाची डरकाळी परदेशातही, केली रेकॉर्डब्रेक कमाई

रोहित शेट्टीचे तारे सध्या फारच जोमात आहेत असं दिसतंय. कारण त्याच्या सिंबाला देशातच नव्हे तर परदेशातही प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळताना दिसून येत आहे.

मसालापटांच्या श्रेणीतील हा सिनेमा प्रत्येक बाबतीत सरस ठरत आहे. दिग्दर्शन, अभिनय, संगीत, अ‍ॅक्शन या सगळ्याचं मिश्रण असलेला हा सिनेमा प्रेक्षकांची आणि समीक्षकांची वाहवा मिळवताना दिसत आहे.

https://twitter.com/taran_adarsh/status/1078990077835898880

सिंबाची जादू फक्त भारतात्च नाही तरा परदेशातही चालली असल्याचं कमाईच्या आकडेवारीवरुन स्पष्ट होत आहे. हा सिनेमा जगभरातील ९६३ स्क्रीनवर प्रदर्शित झाला आहे. आणि रिलीज झाल्यानंतर पहिल्या दोन दिवसांची कमाईच जवळपास १३ कोटींच्या घरात आहे. याशिवाय ऑस्ट्रेलिया आणि कॅनडामध्येही सिंबा पाहण्यासाठी प्रेक्षक गर्दी करत आहेत.

सिंबाचे भारतातील कमाईचे आकडेही चांगले आहेत. या सिनेमाने पहिल्या दिवशी २० कोटींची कमाई केली आहे. ही आकडेवारी पाहता हा सिनेमा १०० कोटी क्लबमध्ये दाखल व्हायला फार वेळ घेणार नाही असं दिसत आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive