By  
on  

तानाजीनंतर अजय देवगणच्या 'दे दे प्यार दे'चा पाहा लुक

'हर हर महादेव' म्हणत, तानाजी द अनसंग वॉरियर या भव्य ऐतिहासिक सिनेमातील आपला लुक चाहत्यांसमोर नुकताच उलगडल्यानंतर नवीन वर्षात अभिनेता अजय देवगण आणखी एका सिनेमाद्वारे प्रेक्षकांसमोर येतोय. दिग्दर्शक ओम राऊतने अजय देवगणचा बहुचर्चित तानाजी लुक चाहत्यांसमोर नव्या वर्षात सादर केल्यानंतर खुद्द अजयच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरुन आणखी एक त्याचा जबरदस्त लुक असलेला फोटो शेअर करण्यात आला आहे. हा लूक त्याचा आगामी सिनेमा दे दे प्यार देममधील असल्याचे समजते आहे.

'दे दे प्यार दे' या सिनेमातील हा फोटो शेअर करत अजयने सर्वांना ट्विटरवरुन नवीन वर्षाच्या शुभेच्छासुध्दा दिल्या आहेत.  अकीव अली दिग्दर्शित आणि लव रंजन व टी सीरिजची निर्मिती असलेला 'दे दे प्यार दे' हा सिनेमा येत्या १५ मार्च रोजी सर्वत्र प्रदर्शित होत आहे.

अजय देवगण सध्या आगामी प्रोजेक्ट्समध्ये बराच व्यस्त आहे. त्याची निर्मिती व पत्नी काजोलची प्रमुख भूमिका असलेला हेलिकॉप्टर ईला प्रदर्शित झाल्यानंतर आता लवकरच त्याचा महत्त्वकांक्षी सिनेमा 'तानाजी द अनसंग वॉरियर'चं चित्रिकरण सुरु आहे. तसंच येत्या दोन वर्षात त्याचे  'सन ऑफ सरदार २', 'चाणक्य', 'टोटल धमाल'हे सिनेमेसुध्दा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.

https://twitter.com/DeDePyaarDe/status/1079953862788870144

 

 

 

 

Recommended

PeepingMoon Exclusive