By  
on  

‘ठाकरे’ सिनेमासाठी ‘चीट इंडिया’ने घेतला हा निर्णय

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे म्हणजे शिवसैनिक आणि संपूर्ण महाराष्ट्राचं प्रेरणास्थान. बाळासाहेबांचा जीवनपट उलगडणारा ठाकरे हा सिनेमा लवकरच प्रदर्शित होतोय. त्यांच्या वादळी आयुष्याचा झंझावात रसिकांना या सिनेमाद्वारे अनुभवता येणार आहे. महत्त्वाचं म्हणजे हा सिनेमा मराठी आणि हिंदी अशा दोन्ही भाषांमध्ये प्रदर्शित होत आहे. पण या बहुप्रतिक्षीत आणि बहुचर्चित सिनेमासाठी इम्रान हाश्मी स्टारर 'चिट इंडीया' हा सिनेमा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतल्याचे समजते.

२५ जानेवारीला ‘ठाकरे’ हा सिनेमासोबतच बॉलिवूडमधले आणखी दोन महत्त्वाचे सिनेमे प्रदर्शित होत आहेत. यात कंगना राणावतचा ‘मणिकर्णिका : द क्वीन ऑफ झांशी’ आणि ‘चीट इंडिया’ या दोन सिनेमांचा समावेश आहे. शौमिक सेन दिग्दर्शित ‘चीट इंडिया’ सिनेमाची आज संध्याकाळी म्हणजे 4 जानेवारी रोजी पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली असून यात या सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्याचा अधिकृत घोषणा करण्यात येणार असल्याचे समजते.

‘ठाकरे’ सिनेमात अभिनेता नावजुद्दीन सिध्दीकी बाळासाहेबांची भूमिका साकारतोय तर अमृता राव मीनाताई ठाकरेंच्या भूमिकेत पाहायला मिळेल. बाळासाहेंबावरील निस्सीम प्रेमापोटी ‘ठाकरे’ सिनेमासमोर इतर कोणताही सिनेमा प्रदर्शित होऊ देणार नाही, असा पवित्रा शिवसैनिकांनी घेतला होता, बहुधा त्यामुळेच 'चिट इंडीया' च्या निर्मात्यांनी प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive