By  
on  

महाराष्ट्रात बाळासाहेब ठाकरेंपेक्षा मोठा स्टार नाही: आमिर खान

संपूर्ण महाराष्ट्राचे प्रेरणास्थान असलेले शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित ‘ठाकरे’ हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. पण प्रदर्शनापूर्वीच तो अनेक अडचणींमध्ये सापडला होता. कधी सेन्सॉरची दृश्यांवर कात्री तर कधी ठाकरे सिनेमात बाळासाहेबांसाठी देण्यात आलेला व्हॉईस ओव्हर यामुळे सिनेमा नेहमीच चर्चेत राहिला. पण आता एक आणखी चर्चा रंगली ती म्हणजे शिवसैनिकांनी घेतलेला आक्रमक पवित्रा. ठाकरे सिनेमासमोर दुसरा कुठलाही सिनेमा प्रदर्शित होऊ न देण्याचा त्यांनी जणू पणच केला.

शुक्रवारी एका वैद्यकीय कार्यक्रमात शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांच्यासमवेत उद्घाटनासाठी बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान उपस्थित होता.  कार्यक्रमानंतर पत्रकारांनी आमिर खानला ठाकरे चित्रपटासंदर्भात प्रश्न विचारला. यावर आमिर म्हणाला, महाराष्ट्रात बाळासाहेबांपेक्षा कोणीही मोठा स्टार नाही. ‘ठाकरे’ सिनेमा प्रदर्शित होताना कोणत्याही सिनेनिर्मात्याला त्यावेळी आपला सिनेमा प्रदर्शित करावासा वाटणार नाही.

बाळासाहेबांचा म्हणजेच महाराष्ट्राच्या मातीतील या वाघाचा जीवनप्रवास पडद्यावर अनुभवण्यासाठी सारेच उत्सुक आहेत. बाळासाहेबांवरील सिनेमा महाराष्ट्रात प्रत्येकालाच पहावासा वाटेल. त्यामुळे त्या दिवशी कोणताही निर्माता आपला सिनेमा प्रदर्शित करु इच्छिणार नाही, असे आमिरने यावेळी स्पष्ट केले.

तत्पूर्वी ‘ठाकरे’ सिनेमासोबत प्रदर्शित होणारा इम्रान हाश्मीचा चिट इंडीया या सिनेमाने काल 4 जानेवारी रोजी ठाकरेचे निर्माते संजय राऊत यांच्यासह संयुक्त पत्रकार परिषद घेऊन आपल्या सिनेमाची तारीख पुढे ढकलली.

२५ जानेवारीला ‘ठाकरे’ हा सिनेमा प्रदर्शित होत असून याच दिवशी कंगना राणौतचा ‘मणिकर्णिका : द क्वीन ऑफ झांशी’ हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive