अशी झाली ‘सिंबा’ची सक्सेस पार्टी, या ता-यांनी लावली हजेरी

By  
on  

रोहीत शेट्टीसाठी या वर्षाची सुरुवात एकदम धमाकेदार झाली आहे. कारण रोहीतचा ‘सिंबा’ कमाईचे रोज नवे विक्रम करत आहे. रोहितने पहिल्यांदाच पोलिसपटासाठी अजय देवगणऐवजी रणवीर सिंगची निवड केली होती. रणवीरनेही सिंबामध्ये दमदार अ‍ॅक्टींग करत ही निवड सार्थ ठरवली होती.


रोहित शेट्टी आणि रणवीर सिंह हे दोघं जर कुठल्या प्रोजे्क्टसाठी एकत्र येत असतील आणि त्यात मस्ती नाही असं होऊच शकत नाही. या दोघांच्या समीकरणामुळे हा सिनेमा सुरुवातीपासून शेवटपर्यंत फक्त धमाकेदारच ठरला. विशेष म्हणजे पदार्पणातील सिनेमा फारसा चमक न दाखवूनही सारा अलीखानला या सिनेमाने तारलं आहे. या सिनेमातही मराठी कलाकारांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे.

https://www.instagram.com/p/BsWEMangzSR/?utm_source=ig_web_copy_link

या सिनेमाचं आतापर्यंतचं कलेक्शन पाहता निर्माता करण जोहरने या सिनेमाची सक्सेस पार्टी आयोजित केली होती. या पार्टीत बॉलिवूडचे अनेक बडे स्टार्स सहभागी झाले होते. रणवीरने त्याच्या नेहमीच्या अंदाजात पार्टीमध्ये जान आणली.

 

. या पार्टीत सर्वांनी ‘झिंगाट’ गाण्यावर डान्सदेखील केला. या डान्सचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. या पार्टीचे फोटो पाहता सगळ्यांनी खुप धमाला केली असंच म्हणावं लागेल.

Recommended

Share