By  
on  

झांशीच्या किल्ल्यात घुमला ‘विजयी भव’चा नारा, मणिकर्णिकाचं हे नवीन गाणं तुम्ही ऐकलं का?

कंगना रानौत आपल्या व्यक्तिरेखेत जीव ओतून काम करते हे प्रत्येकालाच माहीत आहे. कंगनाने तिच्या आगामी ‘मणिकर्णिका : द क्वीन ऑफ झांसी’ या सिनेमातदेखील मेहनत घेतली आहे. या सिनेमातील ‘विजयी भव’ हे गाणं रिलीज झालं असून यात कंगनाचा रणरागिणी लूक खुपच सुंदर दिसत आहे.

या गाण्यातून राणी लक्ष्मीबाईची मृदू आणि कठीण अशा दोन्ही बाजू समोर आल्या आहेत. लढाईसाठी दागिने बाजूला काढून ठेवणारी राणी, तलवार हातात घेऊन डावपेच शिकवणारी योद्धा कंगनाची अशी अनेक रुपं आपल्याला या गाण्यात दिसतात.

शब्दांना सुरेल संगीताची जोड असलेलं ‘विजयी भव’ हे उत्तम समर गीत आहे. हे गाणं प्रसून जोशी यांनी लिहिलं आहे. शंकर, एहसान आणि लॉय यांनी गाण्यावर स्वरसाज चढवला आहे. शंकर महादेवन यांच्या आवाजामुळे हे गाणं श्रवणीय बनलं आहे. या गाण्यात कंगनाने तलवारबाजीचं कौशल्य दाखवलं आहे. सिनेमाच्या निर्मात्यांनी हे गाणं ट्वीटरवर शेअर केलं आहे. त्यासोबतच एक कॅप्शन पण दिलं आहे की जब बेटी उठ खड़ी होती है तभी विजय बड़ी होती है.’ हा सिनेमा २५ जानेवारी २०१९ ला रिलीज होणार आहे.

https://www.youtube.com/watch?time_continue=133&v=0GoDq5gINPo

 

Recommended

PeepingMoon Exclusive