By  
on  

मीनाताई ठाकरेंच्या लुकमध्ये अमृता राव 'शिवतीर्था' वर

यंदा नवीन वर्षाची सुरुवात बयोपिकने सुरु झाली आहे. त्यातील सर्वात बहुप्रतिक्षीत आणि बहुचर्चित बायोपिक म्हणजे हिंदुह्दयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा झंझावात रुपेरी पडद्यावर उलगडणारा ठाकरे सिनेमा.

संजय राऊत निर्मित आणि अभिजीत पानसे दिग्दर्शित ठाकरे सिनेमात हरहुन्नरी अभिनेता नवाजुद्दीन सिध्दीकी बाळासाहेबांची व्यक्तिरेखा साकारतोय तर बाळाहेबांच्या पत्नी मीनाताई ठाकरे यांच्या भूमिकेत अभिनेत्री अमृता राव हिला पाहायला मिळणार आहे.

बाळासाहेबांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहणा-या मीनाताई ठाकरे म्हणजे सर्वांच्याच लाडक्या मॉं साहेब साकारणा-या अमृता रावने नुकतीच शिवतीर्थ येथे मीनाताईंच्या लूकमध्येच भेट दिली.

दरम्यान ठाकरे सिनेमातील आपल्या भूमिकेविषयी बोलताना अमृता म्हणाली, “जेव्हा निर्माता-दिग्दर्शक माझ्यासोबत या सिनेमाचा प्रस्ताव घेऊन चर्चा करत होते,तेव्हा मीनाताईंच्या भूमिकेत ते मलाच पाहतात असं त्यांनी सांगितलं. तसंच माझ्या पूर्वीच्या भूमिकांचीसुध्दा त्यांनी प्रशंसा केली. हे सर्व ऐकून मी थक्कच झाले होते. क्षणभर मी स्तब्धच झाले.”

अमृता पुढे उत्साहात सांगते,आजवर “प्रेक्षकांनी मला भरभरुन प्रेम दिलं आहे. तसंच मीनाताई साकारण्याचा मी शंभर टक्के प्रयत्न केला आहे, सर्वांना माझी ही भूमिकासुध्दा नक्की आवडेल.”

 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive