By  
on  

अंकिता लोखंडेने दिली कबुली हा रोल आहे सगळ्यात आवडता, जाणून घ्या कोणता रोल आहे तो

 

मुंबई येथे एका मॅरेथॉनच्या उद्घाटनासाठी आलेल्या अंकिताने यावेळी तिच्या आवडत्या भूमिकेविषयीही सांगितलं. त्यावेळी बोलताना अंकिता म्हणाली, ‘मणिकर्णिकामधून मी बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. प्रत्येका कलाकारासाठी त्याचा पदार्पणातील भूमिका खुप खास असते. माझ्यासाठीदेखील झलकारीबाईची भूमिका खास आहे.’

मरेथॉनच्या उद्घाटनाला आलेल्या अंकिताने कलाकारसाठी असलेलं फिटनेसचं महत्त्व ही सांगितलं. यावेळी अंकिता म्हणाली, कलाकार त्यांच्या कामात कितीही व्यस्त असले तरी वर्कआउटसाठी आवर्जून वेळ काढतात. कारण या क्षेत्रात तुम्ही आकर्षक असण्यासोबतच फिट असणंही गरजेचं आहे. त्यामुळे मलाही एक्सरसाईज करायला खुप आवडतं.

याशिवाय मणिकर्णिकाच्या निमित्ताने मला तलवारबाजी आणि घोडेस्वारीदेखील करावी लागली यादरम्यान मला फिट असण्याची खूपच मदत झाली.’

[video width="848" height="480" mp4="https://marathi.peepingmoon.com/wp-content/uploads/2019/01/WhatsApp-Video-2019-01-13-at-11.27.20-AM-1.mp4"][/video]

मणिकर्णिका हा सिनेमा २५ जानेवारी २०१९ला प्रदर्शित होणार आहे.

 

Recommended

PeepingMoon Exclusive