By  
on  

अंतराळवीर राकेश शर्माचा बायोपिक शाहरुखने नाकारला

अंतराळवीर राकेश शर्माच्या जीवनपटाची मागील महिन्यात बरीच चर्चा सुरु होती. बॉलिवुड किंग शाहरुख खान यात राकेश शर्माची प्रमुख व्यक्तिरेखा साकारणार होता. आपल्या बहुप्रतिक्षीत 'झीरो'नंतर किंग खान लगेचच या सिनेमाच्या शुटींगला सुरुवात करणार असल्याचं बोललं जात होतं. पण आता नुकत्याच आलेल्या मिडीया रिपोर्ट्सनुसार राकेश शर्माचा हा बायोपिक शाहरुखने सोडला आहे. पण यासाठीचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. 'झीरो'च्या प्रोमोशनदरम्यान किंग खानने या बायोपिकसंदर्भात सविस्तर चर्चासुद्धा केली होती आणि आता अचानक त्याने हा सिनेमा सोडल्याचे वृत्त आले.

शाहरुख खानने राकेश शर्माचा बायोपिक सोडण्यामागे फरहान अख्तरचा 'डॉन 3' असल्याचे कारण आहे, अशी जबरदस्त चर्चा रंगलीय. तिस-या भागासाठी त्याने कंबर कसलीय. तर राकेश शर्मा यांच्या भूमिकेला शाहरुख खानच न्याय देऊ शकतो असा विश्वास दाखवून मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानने या सिनेमासाठी शाहरुखचं नाव सुचवलं होतं.आमिरला इतर वर्क कमिटमेंट्समुळे हा सिनेमा करायला जमणार नव्हता.

महेश मथाई सिनेमाचे या दिग्दर्शन करणार असून सिनेमाचे नाव 'सेल्यूट' ठेवण्यात येणार होते, त्यानंतर त्याचे ‘नाव सारे जहॉं से अच्छा’ करण्यात आले. 13 जानेवारी हा राकेश शर्मा यांचा जन्मदिवस. रॉनी स्क्र्यूवाला आणि सिध्दार्त रॉय कपूर या सिनेमाची निर्मिती करतायत

जर शाहरुखने खरंच हा सिनेमा सोडला असेल तर आता त्याच्या जागी कोणाची वर्णी लागणार, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive