By  
on  

जेव्हा रणवीरचा उल्लेख ‘रणवीर सिंह पादुकोण’ केला जातो तेव्हा..

बॉलिवूडचा एनर्जी मॅन रणवीर सिंह सध्या प्रसिध्दीच्या उंच उंच शिखरावर जाऊन पोहचला आहे. त्याच्या बहुचर्चित सिंबा सिनेमाने बॉक्स ऑफीसवर रेकॉर्डब्रेक कमाई करत प्रेक्षकांची मनं जिंकली तर दुसरीकडे त्याच्या आगामी गली बॉयची जबरदस्त वाहवा सुरुय आणि हा तर झाला फक्त त्याच्या कारकिर्दीचा उल्लेख आहे. व्यक्तीगत जीवनातसुद्धा तो तितकाच य़शस्वी ठरला आहे. अभिनेत्री दीपिका पादुकोणसोबत विवाहबंधनात अडकल्यानंतर त्याच्या आनंदाला जणू उधाणच आलं आहे.

तर त्याचं झालं असं लग्नानंतर मध्यंतरी दीपिका एका टॉक शोमध्ये पाहुणी म्हणून आली होती. तेव्हा तिने मजे-मजेत पतीचा ‘रणवीर सिंह पादुकोण’ असा उल्लेख केला. तर एवढ्यावरच ती थांबली नाही, तर तिने त्या शोच्या निवेदकांना जेव्हा रणवीर तुमच्या कार्यक्रमात येईल तेव्हा तुम्ही त्याला ‘रणवीर सिंह पादुकोण’च म्हणा अशी तंबीसुद्धा दिली होती.

काही एपिसोड्नंतर आता या टॉक शोमध्ये पाहुणा म्हणून यायची रणवीरची वेळ होती, निवेदकाने दीपिकाने दिलेल्या आज्ञेनुसार रणवीरचा ‘रणवीर सिंह पादुकोण’ असा उल्लेख केला. साहजिकच निवेदकासह प्रेक्षकांनासुद्धा यावर रणवीरची काय प्रतिक्रीया असेल, हे जाणून घ्यायची इच्छा होती.

रणवीर म्हणाला, काहीच हरकत नाही हे आडनाव लावायला, उलट हे एक महान आणि कर्तुत्ववान घराण्याचं आडनाव आहे. तसंच तो पुढे हेही म्हणाला की, मला माझ्या पत्नीचं आडनाव लावण्यात काहीच गैर वाटत नाही. जर स्त्रिया पतीचं आडनाव लावू शकतात तर पतीने पत्नीचं आडनाव लावलं तर त्यात वावगं काहीच नाही.

https://www.instagram.com/p/BsfbsLMluHR/?utm_source=ig_embed

 

Recommended

PeepingMoon Exclusive