By  
on  

इम्रान हाश्मीच्या मुलाने कॅन्सरवर केली यशस्वी मात

कुठल्याही आई वडिलांसाठी आपलं मुल हे सर्वस्व असतं. मुलांच्या आनंदासाठी, सुखासाठी प्रत्येक आई-वडील अहोरात्र झटत असतात. मग ते गरीब असोत किंवा श्रीमंत. सामान्य असोत किंवा सेलिब्रिटी. अभिनेता इम्रान हाश्मीचा मुलगा कॅन्सरशी झुंज देतोय, हे आपल्या सर्वांनाच माहितीय. परंतु सोमवारी इम्रानने सोशल मिडीयावर एक आनंदवार्ता चाहत्यांना दिलीय.

इम्रानने सोशल मिडीयावर एक ट्विट केलं आणि मुलाच्या गोड फोटोंसह एक भावनिक मेसेज लिहला आहे. त्यात त्याने अयान आता पूर्णपणे कॅन्सरपासून मुक्त झाल्याचे त्याने म्हटलं आहे. अयान 3 वर्षांचा होता तेव्हा पासून तो किडनीच्या कॅन्सरने ग्रस्त होता. आत्ता पाच वर्षांनी तो कॅन्सरपासून मुक्त झाला आहे. हा प्रवास खुप मोठा होता. कॅन्सरशी दोन हात करणाऱ्या सर्वांसाठी प्रेम आणि प्रार्थना, असं तो म्हणाला.

https://twitter.com/emraanhashmi/status/1084684445175767040

इमरानने बिलाल सिद्दीकी यांच्यासोबत 'द किस ऑफ लाइफ, हाऊ ए सुपरहिरो अॅण्ड माय सन डिफीटेड कॅन्सर' हे पुस्तक लिहिलं आहे. या पुस्तकात आपल्या मुलाच्या संघर्षाची कथा आहे.

 

Recommended

PeepingMoon Exclusive