By  
on  

गोविंदाचा भाचा आणि कॉमेडियन कृष्णा अभिषेक उतरणार निवडणुकीच्या रिंगणात

गोविंदाचा भाचा आणि कॉमेडीयन अभिनेता कृष्णा अभिषेक निवडणुकीच्या रिंगणात उतरतोय. कॉंग्रेसच्या तिकीटावर तो उत्तर मुंबईतील जागेसाठी लढणार आहे. यापूर्वी कृष्णाचा मामा गोविंदासुध्दा याच जागेवरुन निवडणूनक लढला होता आणि विजयी ठरला.

ऑनस्क्रीन आपल्या विनोदांनी प्रेक्षकांना खळखळून हसवणा-या कृष्णाने अनेक मालिका व हिंदी सिनेमांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार या संदर्भात कृष्णाने मागच्याच आठवड्यात कॉंग्रेस नेते संजय निरुपम यांची भेट घेतली. २००४ साली या जागेवर गोविंदा जेव्हा निवडणूक लढला तेव्हा त्याचा लाखो मतांनी विजय झाला होता. आता मामचा रेकॉर्ड कृष्णाने तोडावा अशी कॉग्रेंसच्या पदाधिका-यांची इच्छा आहे.

कृष्णा अभिषेक एकूणच या नवा इनिंगसाठी खुप उत्साहित आहे. तसंच एक पॉप्युलर सेलिब्रिटी असल्याचा फायदा त्याला निवडणुकीत कसा होतो, हे पाहणंसुध्दा औत्सुक्याचं ठरणार आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive