सैफ अली खान आणि अमृता सिंह यांची लाडकी लेक सारा अली खानने 2018 वर्षअखेरेस बॉलिवूडमध्ये लागोपाठ दोन सिनेमांद्वारे दमदार पदार्पण केलं. केदारनाथ सिनेमाने प्रेक्षकांची मनं जिंकल्यानंतर सिंबा सिनेमातून तिने धम्माल उडवून दिली. तिच्या दोन्ही सिनेमांनी बॉक्स ऑफीसवर बक्कळ कमाई केली, साराच्या अभिनयाचं बरंच कौतुक झालं. पण तुम्हाला माहितीय का अभिनय ही साराची पहिली पसंती नाही.
सारा अली खान ही कॉलेजमधील एक हुशार आणि अभ्यासू मुलगी म्हणून ओळखली जायची. ती पुस्तकी किडा होती आणि तिला अभिनयात नाही तर वैद्यकीय क्षेत्रात आपलं करिअर करायचं होतं. सारा म्हणते अभिनय करणं हे जणू स्वपनवतचं होतं. मी आधीपासूनच अभ्यासातच गढलेली असाची.
सारा पुस्तकांमध्ये इतकी मश्गूल असायची की कधीकधी तिची आई अमृता सिंहला पुस्तकं लपवून ठेवावी लागत. अमृता सिंहच्या मत्, अभ्यास जरुर करावा पण अतिअभ्याससुध्दा करु नये.
https://www.instagram.com/p/BrkhWa7HB_Y/