ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार आणि अभिनेत्री सायरा बानू यांची नात सायशा सहगल लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. येत्या 10 मार्चला ती दाक्षिणात्य अभिनेता आर्यासोबत बोहल्यावर चढणार आहे. विशेष म्हणजे आर्या साशापेक्षा 17 वर्षांनी मोठा आहे. गजनीकांत या सिनेमात हे दोघं एकत्र झळकले होते तेव्हापासून ते एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं.
जवळपास एकवर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर सायशा आणि आर्या यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. सायशा ही अभिनेते आणि फिल्ममेकर असलेले सुमित सहगल आणि अभिनेत्री शाहीन यांची कन्या आहे. सायशा अजय देवगणच्या शिवायमध्ये त्याची नायिका म्हणून झळकली होती. तर आर्या हा दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील सुपरस्टार आहे.
https://www.instagram.com/p/Br9rI2RBpqi/
आगामी सिनेमा 'काप्पान'मध्येसुध्दा सायशा आणि आर्या ही जोडी झळकणार आहे.