By  
on  

वरुण धवनच्या पायाला दुखापत; डॉक्टरांनी दिला आरामाचा सल्ला

वरुण धवन रेमो डिसूझाच्या आगामी डान्सवर आधारित सिनेमात प्रमुख भूमिका साकरतोय हे आपल्याला माहितच आहे. पण या सिनेमाच्या सेटवर वरुणला एक छोटासा अपघात झाला आहे. मागच्याच आठवड्यात वरुण या डान्स सिनेमाची शूटींग पंजाबमध्ये करत होता, परंतु शूटींगदरम्यान त्याच्या गुडघ्याला दुखापत झाली आणि डॉक्टरांनी त्याला आराम करण्याचा सल्ला दिला आहे. या डान्स सिनेमाचं पुढील शेड्यूल लंडनमध्ये आहे. म्हणूनच त्यापूर्वी म्हणजे 8 फेब्रुवारी आधी बरं होण्याचा प्रयत्न वरुण करतोय.

हा पूर्णपणे डान्सवर आधारित सिनेमा असल्याने ह्यात विविध डान्स प्रकारांचा समावेश असणार हे वेगळं स्पष्ट करण्याची गरज नाही. या सेटवरील सूत्रांच्या माहितीनुसार, पंजाब शेड्यूलच्या शेवटच्या दिवशी वरुणला डान्सचे तीन विविध खास सीन्स शूट करायचे होते आणि ह्यात विविध स्टेप्स् चा समावेश होता. एका खास स्टेपसाठी वरुणला 15 वेळा गुडघा जमिनीवर आपटायचा होता. ते करताना नेमकं त्याच्या गुडघ्यात आणि पायात जोरजोरात वेदना सुरु झाल्या व पुढील स्टेप्स करणं त्याला अशक्य होऊन बसलं.

सेटवरील या दुखापतीनंतर वरुण लगेचच मुंबईत परतला आणि आता तो आपल्या फिजिओथेरिपीस्टच्या मदतीने लवकरात लवकर रिकव्हर होण्याचा प्रयत्न करतोय, कारण त्याला लंडन शेड्यूलसाठी सज्ज व्हायचंय. यासाठी त्याला हिपॉप, लॅकींग, पॉपिंग आणि स्ट्रीट डान्सची ट्रेनिंगसुध्दा घ्यायचीय.

https://www.instagram.com/p/BtVgABunqYh/

Recommended

PeepingMoon Exclusive