By  
on  

दीपिका आणि रणबीर लवकरच खास प्रोजेक्टसाठी एकत्र झळकणार

आता रणवीर आणि दीपिका पादुकोण हे बॉलिवूड लव्हबर्डस् आयुष्यभरासाठी एकमेकांचे झाले आहेत. पण दीपिकाचा भूतकाळ आपल्या सर्वांनाच माहिती आहे. कोणे एकेकाळी दीपिका आणि रणबीर कपूर एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले होते. त्यांनीसुध्दा प्रेमाच्या अनेक आणाभाका घेतल्या होत्या हे आपल्याला दीपिकाच्या टॅटूवरुन माहितीच आहे. पण रणबीर आता दीपिकाचा भूतकाळ आहे आणि रणवीर वर्तमानकाळ.

रणबीर आणि दीपिकाचं नात्याला जरी आता संपुष्टात आलं असलं तरी अजूनही ते एकमेकांसोबत अगदीच काही वाईट वागत नाहीत. मिडीया रिपोर्ट्सनुसार ही पूर्वाश्रमीचे प्रियकर-प्रेयसी आता पुन्हा एकत्र ऑन-स्क्रीन झळकणार ाहेत. पण हा कुठलाही सिनेमा नाही. तर एका ब्रॅण्ड शूटसाठी ते एकत्र येत आहेत. ह्याचं शुटींगसुध्दा आजपासून सुरु झालं आहे. सिनेमातील या दोघांची सुपरहिट केमिस्ट्री आता या ब्रॅण्ड निमित्ताने पुन्हा अनुभवता येणार आहे. दोघांच्याही चाहत्यांसाठी ही एक पर्वणीच ठरणार आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive