By  
on  

'गली बॉय'पाहून हॉलिवूड अभिनेता आणि रॅपर विल स्मिथनं केलं रणवीरचं कौतुक

बॉलिवूडचा एनर्जी मॅन रणवीर सिंहचं सध्या सर्वत्र जबरदस्त कौतुक होताना दिसतं. त्याला कारणंही तसंच आहे. त्याचा सिनेमा 'गली बॉय' सध्या प्रेक्षक आणि समिक्षकांनी डोक्यावर घेतला आहे. महत्त्वाचं म्हणजे हा सिनेमा परदेशातही प्रदर्शित झाला आहे. हॉलिवूडचा प्रसिध्द अभिनेता आणि रॅपर विल स्मिथनंसुध्दा 'गली बॉय' पाहिला आणि रणवीरचं तोंडभरुन त्याने कौतुक केलं आहे.

आपल्या इंस्टाग्राम स्टोरीवर एक व्हिडीओ शेअर करत विल स्मित म्हणतो, "तुझा सिनेमा 'गली बॉय' जबरदस्त आहे. हिप हॉपला अशाप्रकारे प्रसिध्द होताना पाहून खुप आनंद होतोय."

[video width="640" height="1136" mp4="https://marathi.peepingmoon.com/wp-content/uploads/2019/02/willsmith_52550093_389922388451664_2835718114696078995_n.mp4"][/video]

 

[video width="640" height="1136" mp4="https://marathi.peepingmoon.com/wp-content/uploads/2019/02/willsmith_52647586_548242475661957_4930271511454588921_n.mp4"][/video]

 

तसंच यंदा विल स्मिथ करण जोहरच्या स्टुडंट ऑफ द इयर -2 सिनेमाचे काही खास सीन्सच्य  शूटींगसाठी भारतात आला होता. तेव्हा त्याने रणवीर सिंहची खास भेट घेतली होती. तसंच टायगर श्रऑफ, अनन्या पांडे आणि तारा सुतारिया या कलाकारांसोबत स्मिथने सेटवर भरपूर मस्ती आणि धम्मला केली होती व ह्याचे फोटो आपल्या इंस्टाग्रामवर शेअर केले होते. यावेळी त्याने मुंबईतील ऑटो रिक्षा सफरीचासुध्दा मनमुराद आनंद लुटला.

 

 

Recommended

PeepingMoon Exclusive