By  
on  

विकी कौशल म्हणतो, पुलवामा दहशतवादी हल्ल्याला आपण कधीच विसरु नये

विकी कौशलने उरी  सिनेमात साकारलेल्या आर्मी अधिका-याच्या भूमिकेमुळे तो प्रचंड लोकप्रिय ठरला. हाऊज द जोश म्हणत त्याने सर्वांचीच मनं जिंकली, परंतु नुकत्याच जम्मू-काश्मिर येथील पुलवामा या ठिकाणी दहशतवाद्यांनी केलेल्या आत्मघाती हल्ल्यात आपले 42 जवान शहीद झाले. या निंदनीय घटनेनंतर संपूर्ण देशभरात संतापाची लाट उसळली.

पुलावामाच्या या घृणास्पद घटनेला निंदनीय म्हणत, विकी कौशल सांगतो, " मी कुठल्याच दहशतवादाचं समर्थन करत नाही. आपल्याला जसं जमेल तसं आपण शहिदांच्या कुटुंबियांना मदत करायला हवी. हे आपल्याकडून खुप मोठं योगदान ठरेल. ह्या घटनेला आपण अजिबातच विसरता कामा नये किंवा माफ करु नये, ही शहिदांना मोठी श्रध्दांजली ठरेलं."

https://www.instagram.com/p/Bt-Mr4RDcE3/?utm_source=ig_embed

सिने टीव्ही आर्टिस्ट असोशिएशन म्हणजेच सिंटा आणि 48 अवर फिल्म प्रोजेक्टच्या एका इव्हेंंटच्या शेवटच्या दिवशी विकीने पत्रकारांशी बोलताना ही प्रतिक्रीया दिली.

Recommended

PeepingMoon Exclusive