By  
on  

सोशल मिडियावर सचिन कुंडलकर यांनी शेअर केला सईचा फोटो, चाहत्यांना उत्सुकता

सचिन कुंडलकर यांच्या आगामी पाँडिचेरी सिनेमाची चर्चा सर्वत्र आहे. या सिनेमाच्या शुटिंगसाठी सगळी टीम या वर्षाच्या सुरुवातीलाच पाँडिचेरीला रवाना झाली आहे. सई ताम्हणकर, वैभव तत्ववादी, अमृता खानविलकर, महेश मांजरेकर, नीना कुलकर्णी अशी स्टारकास्ट या सिनेमात असणार आहे. या सिनेमाचं सगळं शुटिंग स्मार्टफोनद्वारे केलं जाणार आहे. त्यामुळे हा सिनेमा एक वेगळा प्रयोग असल्याचं सचिन कुंडलकर आवर्जून सांगतात. या सिनेमाची पटकथा सचिन आणि तेजस मोडकने लिहिली आहे. दूरवर राहणा-या कुटुंबाची गोष्ट, असं याचं कॅप्शन आहे. या सिनेमात सई ताम्हणकर आणि वैभव ही जोडी प्रथमच एकत्र झळकतेय.

https://www.instagram.com/p/BuK_om-BE6m/?utm_source=ig_web_copy_link

सचिन यांनी अलिकडेच सई ताम्हणकरचा एक फोटो सचिन यांनी सोशल मिडियावरून शेअर केलेला आहे. या फोटोत केशरी रंगाची साडी नेसलेली सई एका स्त्रीच्या चित्राकडे पहात उभी आहे. या लूकवरून सईच्या चाहत्यांची उत्सुकता वाढीस लागलेली आहे. हा लूक पाँडिचेरीमधील सईच्या व्यक्तिरेखेचा लूक आहे का अशी चर्चाही रंगू लागली आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive