अक्षय कुमार म्हणतोय,'अज्ज सिंह गरजेगा'; पाहा 'केसरी'चं हे दुसरं गाणं

By  
on  

अक्षय कुमार आणि परिणीती चोप्रा स्टारर 'केसरी' सिनेमाचं दुसरं गाणं नुकतंच उलगडलं आहे. 'अज्ज सिंह गरजेगा' असं हे गाणं असून यात अफगाणांविरोधात सरदारांनी पुकारलेल्या युध्दाची आक्रमकता पाहायला मिळते. या गाण्यातून अफगामांना सळो की पळो करुन सोडण्याची धमक या सरदारांच्या नसानसांतून धावतेय. जॅझी बी यांनी स्वरसाज चढवलेल्या या गीताला चिरंतन भट्ट यांनी संगीतबध्द केलं असून कुंवर जुनेजा यांनी हे गीत लिहलं आहे.

यापूर्वी ‘सानु केहंदी’ हे गाणं प्रदर्शित झालं होतं. या गाण्यात सिनेमातील २१ शिपायांमधील एकमेकांशी असलेलं बाँडिंग दिसून आलं . सारागढीच्या किल्ल्यावर मिळालेल्या निवांत क्षणी हे सैनिक मजा-मस्ती करताना दिसले. पंजाबी लोकसंगीताचा फिल या गाण्याने साधला .

अक्षय कुमार स्टारर ‘केसरी’ धर्मा प्रॉडक्शनचा सिनेमा आहे. सारागढी लढाईच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीवर हा सिनेमा बेतला आहे. येत्या  २१ मार्चला ‘केसरी’ प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

https://youtu.be/WmhHUH64xlI

 

Recommended

Loading...
Share