By  
on  

या सिनेमात आयुष्मान दिसणार पोलिस अधिका-याच्या भूमिकेत

कठोर मेहनतीच्या जोरावर मिळालेल्या यशाची चव काय असते ते अभिनेता आयुष्मान खुरानाला चांगलंच माहितीय. 'बधाई हो' आणि 'अंधाधून'चं जबरदस्त यश साजरं केल्यानंतर आय़ुष्मान आता पुन्हा नव्या जोमाने कामाला लागल्याचं दिसून येतंय. त्याच्या आगामी सिनेमातील भूमिकेचा फर्स्ट लूक नुकताच समोर आला आहे. ह्यात आयुष्मान दबंग पोलिस अधिका-याची भूमिका साकारतोय.

मूल्क सिनेमाचे दिग्दर्शक अनुभव सिन्हा यांच्या 'आर्टीकल 15' या सिनेमात आयुष्मान खुराना आपल्याला एका कर्तव्यदक्ष पोलिस अधिका-याच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. लखनऊमध्ये 1 मार्चपासून या आगामी सिनेमाच्या शूटींगला सुरुवातसुध्दा झाली. आयुष्मानसोबत ईशा तलवार या सिनेमात प्रमुख भूमिकेत आहेत. मनोज पहवा, सयानी गुप्ता, कुमुद मिश्रा, मोहम्मद जीशान अय्यूब यांच्याही सिनेमात महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.

https://www.instagram.com/p/Btl2RLaglag/

सर्वांनाच आयुष्मानला 'आर्टीकल 15' या सिनेमात पाहण्याची प्रचंड उत्सुकता लागून राहिली आहे.

https://twitter.com/taran_adarsh/status/1103121055722303488

Recommended

PeepingMoon Exclusive