By  
on  

First Look:'कलंक'मधील आलियाचं हे मनमोहक रुप पाहून तुम्हालाही पडेल भुरळ

करण जोहरच्या आगामी मल्टिस्टारर आणि बहुप्रतिक्षीत 'कलंक' सिनेमातील आलिया भटचा फर्स्ट लूक आज महिला दिनानिमित्ताने उलगडण्यात आला आहे. एखाद्या नववधुप्रमाणे आलियाचं हे मनमोहक रुप पाहताक्षणीच भुरळ पाडतंय. माधुरी दीक्षितने तिच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरुन आलियाचा हा कलंक फर्स्ट लूक चाहत्यांसमोर सादर केला. या तगडी स्टारकास्ट असलेल्या सिनेमात आलिया 'रुप' ही व्यक्तिरेखा साकारतेय.

https://www.instagram.com/p/BuvFPAFn7ns/?utm_source=ig_embed

7 मार्चला 'कलंक'मधील वरुण धवन,आदित्य रॉय कपूर आणि संजय दत्त या नायकांचे लूक उलगडल्यानंतर निर्मात्यांनी महिला दिनी नायिकांचे लूक उलगडणार आहेत. ‘कलंक’ हा सिनेमा प्रेक्षकांना 1940 च्या काळात घेऊन जाणार आहे.

करण जोहरने यापूर्वीच ‘कलंक’ सिनेमाशी आपलं असलेललं नातं, एक भावनिक पोस्ट करत शेअर केलं. “हा सिनेमा १५ वर्षांपूर्वी माझ्या मनात उमटला होता. माझ्या वडिलांनी जाण्यापूर्वी या सिनेमावर काम केलं होतं. हा सिनेमा पाहणं त्यांचं स्वप्न होतं… मी ते पूर्ण करू शकलो नाही… माझा जीव तळमळला… पण आज त्यांच्या इच्छेला पडदा लाभला आहे… अस्थिर नाती आणि अनंत प्रेमाच्या गोष्टीला आवाज मिळाला आहे. ४०च्या दशकावर आधारलेला हा सिनेमा… उद्यापासून याचा प्रवास सुरु होत आहे… मला आशा आहे तुम्हीही माझ्यासोबत या वाटेवर याल’…. करणचा हा सिनेमा १९ एप्रिलला रिलीज होणार आहे.”

Recommended

PeepingMoon Exclusive