By  
on  

'ब्रम्हास्त्र'मधला रणबीर कपूरचा हा आहे फर्स्ट लूक

रणबीर कपूर आणि आलिया भट या बहुचर्चित जोडीचा 'ब्रम्हास्त्र' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. महत्त्वाचं म्हणजे बिग बी अमिताभ बच्चनसुध्दा या सिनेमात प्रमुख भूमिकेत आहेत. त्यामुळे सर्वांनाच या सिनेमाकडून प्रचंड अपेक्षा आणि उत्सुकतासुध्दा आहे. सिनेमाचा दिग्दर्शक अयान मुखर्जीने प्रेक्षकांमध्ये या सिनेमाबाबत आणखी इत्सुकता वाढवण्यासाठी आपल्या इंन्स्टाग्रामवर रणबीरचा 'ब्रम्हास्त्र'मधील फर्स्ट लूक शेअर करत कोड्यात टाकलं आहे.

हा फोटो शेअर करताना अयानने एक पोस्ट केली आहे. ''रणबीरच्या लूकमध्ये अनेक बदल करण्यात आले. हा रणबीरचा सिनेमातला सगळ्यात पहिला लूक होता जो फायनल झाला नाही. यात रणबीरचे केस फार मोठे आहेत. अयानने या पोस्टमध्ये लिहिलं आहे की, रणबीरचे नाव आधी यात रुमी होते. ज्यानंतर ते बदलून शिवा ठेवण्यात आले.

https://www.instagram.com/p/Bu0Xxf4HQT5/?utm_source=ig_embed

Recommended

PeepingMoon Exclusive