By  
on  

आयुषमानचा सुपरहिट ‘अंधाधून’ आता चीनमध्ये प्रदर्शित होणार

आयुष्मान खुराना आणि राधिका आपटे यांचा चक्रावून टाकणारा धम्माल सस्पेन्स थ्रीलर 'अंधाधून' या सिनेमाने बॉक्स ऑफीसवर कोटीच्या कोटी उड्डाणे घेत प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. 2018 साली प्रदर्शित झालेल्या या सिनेमाने लोकप्रियतेचे अनेक उच्चांक मोडले. श्रीराम राघवन दिग्दर्शित 'अंधाधून'हा सिनेमा लवकरच आता चीनवारीसाठी निघाला आहे.

'अंधाधून' हा सिनेमा 'पियानो प्लेअर' म्हणून चीनमध्ये प्रदर्शित होत असल्याची माहिती वायाकॉम 18ने आपल्या ट्विटर हॅण्डलवरुन दिली आहे. चीनमध्ये गेल्या वर्षभरापासून भारतीय चित्रपटांना प्रेक्षकांची चांगली पसंती मिळताना दिसून येत आहे. ‘बजरंगी भाईजान’, ‘हिचकी’, ‘हिंदी मिडीअम’ यांसारखे सिनेमे चीनमध्ये प्दर्शित झाले असून त्यांना प्रेक्षकांकडून चांगली दाद मिळाली आहे.

https://twitter.com/Viacom18Movies/status/1105046807845851137

'अंधाधून'सोबत श्रीदेवी यांचा अखेरचा सिनेमा 'मॉम'सुध्दा चीनमध्ये प्रदर्शित होत आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive