अक्षय कुमार साकारणार 'पृथ्वीराज', जाणून घ्या तो काय म्हणतोय

By  
on  

बॉलिवूडचा खिलाडी आणि सुपरस्टार अक्षय कुमार लवकरच आपल्या दमदार अभिनयाने सजलेला 'केसरी' हा सिनेमा घेऊन प्रेक्षकांसमोर येतोय. सिनेमाच्या प्रदर्शनाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट पाहतायत. पण या सिनेमापूर्वीच त्याने आपल्या आगामी सिनेमाविषयी आणखी एक खुलासा नुकताच केला आहे. पृथ्वीराज हा अॅक्शनपटसुध्दा अक्षयने साईन केल्याचं नुकतंच केसरीनिमित्त आयोजित एका पत्रकार परिषदेत त्याने सांगितलं आहे. लवकरच या सिनेमाचं शुटींगही तो सुरु करणार आहे.

आपल्या आगामी सिनेमांबद्दल अक्षयने या पत्रकारपरिषदेत अनेक गोष्टी उलगडल्या. येत्या 21 मार्च रोजी केसरी प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. त्यानंतर रोहित शेट्टीच्या सूर्यवंशीच्या शूटींगला तो सुरुवात करणार असून  ृ'सूर्यवंशी' सपवून मग 'पृथ्वीराज'चं काम अक्षय हाती घेईल असंही त्याने स्पष्ट केलं. 'पृथ्वीराज' हा अॅक्शन वॉर मूव्ही आहे. अक्षय लागोपाठ दोन अॅक्सन मूव्ही करतोय. एक तर 'केसरी' आणि दुसरा 'सूर्यवंशी'.

महत्त्वाचं म्हणजे 'पृथ्वीराज' बिग बजेट सिनेमा असून करण जोहरच्या धर्मा प्रोडक्शन ह्याच्या निर्मितीची धुरा सांभाळण्याची शक्यता आहे.

Recommended

Loading...
Share