By  
on  

काय सांगता आमिर म्हातारा झाला, विश्वास बसत नाही .... मग हा व्हिडीओ पाहा

मि. परफेक्शनिस्ट आमिर खान म्हटलं की त्याच्या सर्व गोष्टी अगदी तंतोतंत योग्यच असतात. तो आपल्या कामात कधीच कुठल्या गोष्टीची कसर कमी पडू देत नाही, त्यासाठी योग्य ती सर्व मेहनत तो करतो. पण तुम्ही म्हणाल यात आमिरच्या म्हातारं होण्याचं काय कनेक्शन. चला तर मग तुम्हाला सांगतो, सोशल मिडीयावर आमिरचा एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होतोय. यात आमिर चक्क म्हातारा कसा झाला हे पाहायला मिळतंय.

आमीरनं स्वत: हा व्हिडिओ ट्विट केला आहे. या व्हिडिओत आमीरसोबत काही मेक अप आर्टिस्ट दिसत असून आमीरला ते पांढऱ्या केसांचा विग, जाड भिंगाचा चष्मा असा मेक अप करत वृद्धाचा लूक देताना दिसत आहेत. या सगळ्या तयारीचा व्हिडिओ आमीरनं चाहत्यांसोबत शेअर केला आहे.  पण त्याची ही ज्य्यत तयारी नेमकी कोणच्या प्रोजेक्टसाठी आहे, हे मात्रं अद्याप गुलदस्त्यातच आहे. त्याने या व्हिडीओसोबत एक जबरदस्त  कॅप्शनसुध्दा दिलं आहे," लवकरच येतोय, तुमच्या फोनवर"

https://twitter.com/aamir_khan/status/1108588001809043457

आमिरच्या या व्हिडीओमुळे अनेक तर्कवितर्कांना उधाण आलं होतं. हा कुठला आगामी सिनेमा तर नाही ना अशी चर्चा सुरु झाली. पण काही वेळातच एका व्हिडीओतून ह्याचं उत्तर उलगडलं. एका अॅपच्या जाहिरातीसाठी आमिरने हा वयोवृध्द लूक केला होता.

https://youtu.be/kAj9GpT7E_U

Recommended

PeepingMoon Exclusive