By  
on  

श्रध्दा कपूरच्या लग्नाच्या चर्चांवर वडील शक्ती कपूर म्हणतात

बॉलिवूडची एक आघाडीची अभिनेत्री म्हणून पाहिल्या जाणा-या श्रध्दा कपूरकडे सध्या एकाचवेळी अनेक सिनेमांच्या ऑफर्स आहेत आणि लवकरच तिचे 'स्ट्रीट डांन्सर', 'साहो' आणि 'छिछोरे' हे सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला येतायत. पण आता ती सिनेमांसाठी नाही तर एका वेगळ्याच कारणासाठी चर्चेत आहे. काय तर म्हणे यंदा श्रध्दा बोहल्यावर चढणार आहे.

कालपासून श्रध्दा कपूर आपल्या कथित बॉयफ्रेंड रोहन श्रेष्ठासह लग्नबंधनात अडकणार असल्याच्या चर्चा प्रसिध्दी माध्यमांनध्ये रंगल्या होत्या. श्रद्धा कपूर आणि रोहन श्रेष्ठा गेल्या अनेक वर्षांपासून एकमेकांना ओळखतात. परंतु 2018 पासून दोघे एकमेकांना डेट करत असल्याचे वृत्त आहे. रोहन श्रेष्ठा हा फोटोग्राफर आहे. पण या संपूर्ण बातमीवर नुकतीच अभिनेते आणि श्रध्दाचे पिता शक्ती कपूर यांनी आपली प्रतिक्रीया दिली आहे.

एका वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत शक्ती कपूर म्हणतात, "श्रध्दा सध्या आपल्या सिनेमांवर लक्ष केंद्रित करतेय. पुढील 4-5 वर्ष तरी श्रध्दाचा लग्न करण्याचा कोणताच विचार नाहीय. या सर्व अफवा आहेत. तिला जीवनात बरंच काही करायचंय. पुढील दोन वर्ष तरी ती शूटींगमध्येच व्यस्त आहे."

शक्ती कपूर पुढे म्हणतात, "यापूर्वीसुध्दा श्रध्दाचं नाव अनेक अभिनेत्यांबरोबर जोडलं गेलं होतं, पण शेवटी ही इंडस्ट्री आहे. रोहनचे वडील आणि मी अनेक वर्षांपासूनचे मित्र आहोत. श्रध्दा तिच्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट माझ्या सहमतीनेच करते."

Recommended

PeepingMoon Exclusive