By  
on  

बिग बींनी सामाजिक कार्यकर्ते विजय बारसे यांची घेतली भेट

बिग बी अमिताभ बच्चन यांचा बदला हा सिनेमा नुकताच प्रदर्शित झाला. या सिनेमातील त्यांचा परफॉर्मन्स नेहमीप्रमाणेच अफलातून होता आणि आता सर्वांना त्यांच्या आगामी झुंड सिनेमाचे वेध लागले आहेत. सैराट फेम मराठमोळे दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. त्यामुळे या सिनेमाबाबतची उत्सुकता आणखी वाढली आहे.

झुंड सिनेमात अमिताभ बच्चन एक रिअल लाईफ व्यक्तिरेखा साकारतायत. विजय बारसे या सामाजिक कार्यकर्त्याच्या भूमिकेत त्यांना आपल्याला पाहायला मिळेल. झोपडपट्टीतील मुलांना फुटबॉलचं प्रशिक्षण देण्याचं कार्य विजय बारसे करतात आणि त्यांना अव्वल फुटबॉलपटू बनविण्याची त्यांची महत्त्वकांक्षा असते. नागपूरमधील एनजीओ स्लम सॉकर्सचे ते फाऊंडर आहेत. म्हणूनच या सिनेमानिमित्ताने अमिताभ यांनी नुकतीच विजय बारसे यांची भेट घेतली.

‘झुंड’ या बहुचर्चित सिनेमानिमित्ताने बिग बी आणि नागराज मंजुळे एकत्र येत असल्याने मराठी सिनेसृष्टीसह तमाम बॉलिवूड कलाकारांमध्ये याबाबत कमालीची उत्सुकता दिसून येतेय. आता या सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर झाली आहे. ‘झुंड’ हा सिनेमा यंदा 20 सप्टेंबरला प्रदर्शित होत आहे.

 

Recommended

PeepingMoon Exclusive