By  
on  

आजारपणातून ब-या होत असलेल्या इरफानचे दर्शन, खुप दिवसांनी दिसली थेट झलक

अभिनेता इरफान आता न्युरोएंडोक्राईम ट्युमर या आजारातून बरा होताना दिसत आहे. इरफान आता भारतात आला असून त्याने आगामी सिनेमाची तयारी सुरु केली आहे. इरफान आगामी ‘हिंदी मिडियम २’मध्ये झळकणार आहे. त्याच्यासोबत या सिनेमात करीना कपूर आणि राधिका मदान झळकणार आहेत. भारतीय शिक्षण पद्धतीचा फ्रेश टेक या सिनेमात बघायला मिळेल. या सिनेमाचं प्री प्रॉड्क्शन सुरु झालं असून एप्रिलमध्ये सिनेमा फ्लोअरवर जाईल.

इरफान नुकताच विमानतळावर स्पॉट झाला विशेष म्हणजे त्याने मागील वेळेसारखा यावेळी चेहरा अजिबात लपवला नाही. उलट तो आत्मविश्वासाने कॅमे-यांना सामोरं जात असल्याचं दिसत होतं.

Recommended

PeepingMoon Exclusive