By  
on  

पाहा करण जोहरच्या 'स्टुडंट ऑफ द इयर 2'चा ट्रेलर, नवीन बॅचने घेतलंय अॅडमिशन

अखेर करण जोहरच्या बहुप्रतिक्षीत 'स्टुडंट ऑफ द इयर 2'चा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. टायगर श्रॉफ, तारा सुतारिया आणि अनन्या पांडे या फ्रेश स्टारकास्टच्या अभिनयाने सजलेला हा सिनेमा लवकरच प्रदर्शित होत आहे.

पाहा ट्रेलर :

https://youtu.be/QZsthdsh6yk

या सिनेमाच्या पहिल्या भागात आलिया भट, वरुण धवन आणि सिध्दार्थ मल्होत्रा यांनी पहिल्या भागातून प्रेक्षकांची मनं जिकल्यानंतर आता एक फ्रेश स्टारकास्ट या सिक्वलमध्ये पाहायला मिळणार आहे. ‘स्टुडंट ऑफ द इयर 2’ सिनेमात टायगर श्रॉफसोबतच चंकी पांडेची मुलगी अनन्या पांडे आणि तारा सुतारिया या दोन नवोदित अभिनेत्री पदार्पण करत आहेत.

येत्या 10 मे रोजी ‘स्टुडंट ऑफ द इयर 2’ हा करण जोहरची निर्मिती असलेला फ्रेश सिनेमा सर्वत्र प्रदर्शित होत आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive