सलमान खानच्या 'भारत'मधून कतरिना कैफचा फर्स्ट लूक

By  
on  

सलमान खानचा बहचर्चित आणि बहुप्रतिक्षीत सिनेमा 'भारत'मधून येत्या दोन दिवसांत त्याचे दोन लूक्स उलगडल्यानंतर सिनेमातील त्याची नायिका कतरिना कैफचा सिनेमातील लूक आज सर्वांसमोर आला आहे. या पोस्टरमध्ये कतरिनासोबत सलमानसुध्दा दिसतोय. ह्या पोस्टरबरोबरच एक जबरदस्त टॅगलाईन देमअयात आलीय, "और हमारी जिंदगी में आयी मॅडम सर!" त्यामुळे आता ही नेमकी काय भानगड आहे, हे सिनेमा पाहिल्यावरच लक्षात येईल.

सलमान खानच्या 'भारत'चं दिग्दर्शन अली अब्बास झफर यांनी केलं असून ईदच्या मुहूर्तावर म्हणजेच 5 जून रोजी प्रेक्षकांच्या भेटीाला येत आहे.

https://twitter.com/Bharat_TheFilm/status/1118386495835070467

सलमान खान आणि कतरिना कैफ स्टारर ‘भारत’ सिनेमाचं दिग्दर्शन अली अब्बास जफरने केलं आहे असून अतुल अग्निहोत्री याची निर्मिती करत आहेत. या सिनेमात जॅकी श्रॉफ, सोनाली कुलकर्णी, तब्बू, दिशा पटानी हेसुध्दा महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकणार आहेत.

Recommended

Loading...
Share