'सूर्यवंशी'मध्ये कतरिना-अक्षयची सुपरहिट जोडी, 9 वर्षानंतर पुन्हा करणार स्क्रीन शेअर

By  
on  

अक्षय कुमार स्टारर 'सूर्यवंशी' सिनेमात त्याची नायिका म्हणून आता कतरिना कैफच्या नावावर अधिकृतचं शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. महत्त्वाचं म्हणजे यामुळेच कतरिना आणि अक्षय ही सुपरहिट जोडी तब्बल 9 वर्षाने एकत्र झळकतेय. या जोडीने अनेक सिनेमात एकत्र काम केलंय. फरहा खान दिग्दर्शित तीस मार खॉंन हा त्यांचा शेवटचा सिनेमा होता.

सिंबाच्या जबरदस्त यशानंतर लगेचच रोहित शेट्टीने आपला पुढचा पोलीसपट 'सूर्यवंशी'ची घोषणा केली होती. पण त्यानंतर त्याने या सिनेमाचा नायक अक्षय कुमार असल्याचे जाहीर केले होते,पण नायिकेचे नाव मात्र गुलदस्त्यातच होते. अखेर सूर्यवंशीमध्ये अक्षयचीा नायिका कतरिना असल्याचे करण जोहरने ट्विट करत सांगितले आहे. करणने ट्विटमध्ये सूर्यवंशी गर्ल कतरिनाचं स्वागत आहे, वेलकम ऑनबोर्ड असं म्हणत 'सूर्यवंशी' ईद 2020 ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचेही नमूद केले आहे.

https://twitter.com/karanjohar/status/1120137323365060609

सूत्रांनी पिपींगमूनला दिलेल्या माहितीनुसार कतरिना सिनेमात अक्षयच्या पत्नीच्या भूमिकेत दिसणार आहे.यासाठी त्याचं पोस्टरचं पण फोटोशूट पार पडल्याची माहिती मिळतेय.

‘नमस्ते लंडन’, ‘हमको दीवाना कर गए’, ‘वेलकम’, ‘दे दना दन’ आणि ‘सिंह इज किंग’ या सिनेमांमधून अक्षय- कॅटच्या जोडीने धम्माल उडवली होती.

 

Recommended

Loading...
Share