कॅन्सरमुक्त झाल्याची ऋषी कपूर यांनी भावूक होत दिली माहिती

By  
on  

कॅन्सरसारख्या जीवघेण्या आजाराने त्रस्त असलेले बॉलिवूड सेलिब्रिटी आपल्याला माहितच आहेत. अशातच काही महिन्यांपूर्वी ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांना कॅन्सर झाल्याचं निदान झालं. त्या उपचारासाठी ते आपल्या कुटुंबियांपासून लांब परदेशात होते. त्यामुळे भारतीय सिनेमात आपलं बहारदार योगदान देणा-या ह्या अभिनेत्याला कॅन्सर झाल्याची बातमी ऐकून चाहत्यांनी त्यांच्या प्रकृतीसाठी मनोभावे प्रार्थना केली.

पण नुकतंच राहुल रवेल या प्रसिध्द फिल्ममेकरने फेसबुक पोस्टव्दारे ऋषी कपूर कॅन्सरमुक्त झाल्याची बातमी दिली आणि सर्वत्र आनंदाची लाट पसरली आहे. तसंच ऋषी कपूर यांनीसुध्दा एका आघाडीच्या वृत्तपत्राशी बोलताना आपल्या ट्रीटमेंटबद्दल माहिती दिली. त्यांच्या या कठीण काळात त्यांची पत्नी अभिनेत्री नितू कपूर सतत त्यांना खंबीर साथ देत होती. तसंच मुलगा अभिनेता रणबीर कपूर आणि मुलगी रिध्दीमा कपूर हे दोघंही ऋषीजींच्या तब्येतीची विचारपूस करण्यास आणि त्यांना क्वालिटी टाईम देण्यासाठी परदेश वा-या करत असत.

ऋषी कपूर यांनी मागच्या वर्षी 2018 मध्ये ट्विटरद्वारे आपण उपचारासाठी यूएसला रवाना होत असल्याचं सांगितलं होतं. तसंच आई कृष्णा राज कपूर यांचं निधन झाल्यावरही ते उपचार घेत असल्याने त्याचं अंत्यदर्शन घेऊ शकले नव्हते.

Recommended

Loading...
Share