रोहित शेट्टीच्या 'सूर्यवंशी'मध्ये 'सिंबा'आणि 'सिंघम'ची धम्माल

By  
on  

दिग्दर्शक रोहित शेट्टीचे सिनेमे म्हणजे अॅक्शन आणि कॉमेडी ड्रामाची जबरदस्त मेजवानी. 'सिंबा'च्या घवघवीत यशानंतर सर्वांनाच आता वेध लागले आहे, ते 'सूर्यवंशी'चे. या सिनेमाबाबत एक मस्त अपडेट हाती आली आहे ती म्हणजे, 'सूर्यवंशी'मध्ये अक्षय कुमार हा प्रमुख भूमिकेत जरी असला तरी रणवीर सिंह आणि अजय देवगण हे दोघे ह्यात पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत पाहायला मिळतील. त्यामुळे 'सूर्यवंशी'मध्ये 'सिंबा' आणि 'सिंघम'ची धम्मालसुध्दा अनुभवण्याचा प्रेक्षकांना एक सुखद आणि हटके अनुभव मिळणार आहे.

नुकताच सोशल मीडियावर अभिनेता अक्षय कुमारने एक फोटो शेअर करत याविषयीची माहिती दिली आहे. शेअर करण्यात आलेल्या फोटोमध्ये अभिनेता रणवीर सिंह, अजय देवगण, अक्षय कुमार, रोहित शेट्टी आणि करण जोहर झळकत आहेत.

सूत्रांकडून नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार मे महिन्याच्या 6 तारखेपासून हा सिनेमा फ्लोअरवर जाईल व सिनेमाच्या शूटींगला खरी सुरुवात होईल.

https://www.instagram.com/p/BxHFSBXnakL/?utm_source=ig_embed

Recommended

Loading...
Share