By  
on  

अभिनयाच्या बाबतीत दीपिकाची आई तीच्यापेक्षा सरस, कसं ते जाणून घ्या!

अभिनेत्री दीपिका पादुकोणने आपल्या वैविध्यपूर्ण भूमिकांमुळे बॉलीवूडमध्ये स्वतःचं असं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. आपल्या या करियरमध्ये आई बाबांचा मोलाचा वाटा आहे, असं तीने वेळोवेळी सांगितलं आहे. नुकत्याच झालेल्या 'मदर्स डे' निमित्ताने बॉलीवूडच्या अनेक सेलिब्रिटींनी स्वतःच्या आईचा फोटो पोस्ट करून आईबद्दलच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

दीपिकाने एका वेगळ्या अंदाजात 'मदर्स डे'च्या शुभेच्छा दिल्या आहेत. दीपिकाने आईचा एक व्हिडिओ शेयर करून त्या व्हिडिओखाली मजेदार कॅप्शन लिहीलं आहे. 'आत्ता तुम्हा सर्वांना कळेल माझ्यात हा अभिनयाचा कीडा कुठून आला. माझी मित्र, मार्गदर्शक आणि प्रेरणास्थान असलेल्या आईला हैप्पी मदर्स डे.'

https://www.instagram.com/p/BxXtCjRAUaC/

दीपिकाने या पोस्टतर्फे आई उज्जवला पादुकोण आणि अंजू भागनानी या दोघींना 'मदर्स डे'च्या शुभेच्छा दिल्या. या व्हिडिओमध्ये दीपिकाची आई घरातल्या एका सदस्याची नक्कल करत असलेली दिसून येत आहे. या व्हिडिओला दीपिकाच्या चाहत्यांची भरघोस पसंती मिळाली आहे.

 

Recommended

PeepingMoon Exclusive